दुपारनंतर आणखी १८ रुग्णांची वाढ; दोन रुग्णांचा मृत्यू
कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ३५१५ वर
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळनंतर पुन्हा दुपारनंतर १८ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३५१५ वर गेली आहे. तर आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत कोरोनामुळे १९० रुग्णांचा मृत्यू झाले आहेत.
आज सकाळी आलेल्या अहवालानुसार कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १३७ ने वाढली होती. तर यात आणखी १८ रुग्णांची भर पडली आहे. यात आकाशवाणी परिसर-१, बुड्डीलेन-१ , कटकट गेट-१, एन सहा, सिडको, मथुरा नगर -१, देवळाई -१, हर्सुल मध्यवर्ती कारागृह-२, हर्सुल जेल क्वार्टर -१, संभाजी कॉलनी, एन सहा-१, श्रीराम कॉलनी, शिवाजी नगर, वाळूज-१, सादात नगर -१, भारत नगर, एन बारा, हडको-१, सिंधी कॉलनी -१, शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी-१, सिल्क मिल कॉलनी -१, सुरेवाडी, नागेश्वरी शाळेजवळ-१, नारेगाव-१, सुरेवाडी, जाधववाडी परिसर -१ या भागातील कोरोनाबाधित आहेत. यापैकी १५ पुरूष आणि ३ स्त्री रुग्ण आहेत. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३५१५ झाली आहे. त्यापैकी१८५७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १९० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता १४७८ रुग्णांवर उपचार सुरू आहे.